अधिकाऱ्यांनो, शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करा

पुणे – प्रभागातील रस्त्यांपासून ते क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे, जागा, कचरा वर्गीकरण, शहरात जागोजागी होणारे विद्रूपीकरण यावर सर्व विभाग प्रमुख तसेच सहायक आयुक्तांनी स्वत: लक्ष द्यावे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्‍यक उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छतेच्या प्रत्येक कामाची चेकलिस्ट तयार करून ही कामे दररोज होतील, याची खबरदारी घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांना मंगळवारी दिले.

स्वच्छ भारत अभियान तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत महापालिकेने शहर स्वच्छतेचे “थ्री स्टार’ मानांकन जाहीर केले आहे.

स्वच्छ भारत अभियानात पहिल्या तीन वर्षांत महापालिकेचा क्रमांक 10च्या आत आलेला नाही. तर पुणे शहर देशात स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या पाच शहरांमध्ये असावे, यासाठी राज्य शासनाने महापालिकेस वारंवार सूचना केल्या आहेत. तसेच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महापालिकेकडून यावर्षी या सर्वेक्षणास तीन महिने आधीच सुरूवात करण्यात आली आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून वेगवेगळ्या उपाय योजनाही राबविल्या जात आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त राव यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्या. त्यात शहरातील स्वच्छतागृहे, पदपथ, सार्वजनिक रस्ते, कचराकुंड्या, महापालिकेची कार्यालये, नदीकाठ, तलाव तसेच अस्वच्छता होत असलेल्या ठिकाणांच्या कामांची चेकलिस्ट करून त्यानुसार, ही कामे तातडीने करण्याचे आदेश दिले. तसेच हे अभियान कोणत्याही एका विभागाची जबाबदारी नसून सर्व विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालयांनीही तातडीने शहर स्वच्छतेसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयुक्त राव यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)