पुणे – पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट शासनाने ठेवली आहे. त्याचबरोबर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे एमटीडीसीचा पदभार न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाच्या पर्यटन धोरणानुसार पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकल्प गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन दरवर्षी दहा टक्के क्षेत्रीय वाढ करणे, विभागस्तरावर पायाभूत सुविधा पुरवणे, जिल्हा पर्यटन समिती स्थापन करावी, महाराष्ट्र पर्यटन गुंतवणुकीस सुलभ करणे आदी घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.

या सर्व घटकांना सामावून घेणारे पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम एमटीडीसीच्या विविध विभागांत काम करताना पूर्ण केलेले असणे अपेक्षित आहे. प्रादेशिक अधिकारी म्हणून काम करताना पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)