अधिकाऱ्यांच्या नकारात्मकतेमुळे विकासकामात अडथळे – नितीन गडकरी

File photo

नागपूर – केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना आखल्या जातात. मात्र, विकासाच्या चालत्या गाडीत रोखण्यारे एक्‍स्पर्ट महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसले आहेत. मंत्रालयात मंजूर कामासंदर्भात नकारात्मक सूर लावून विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांची कमी नाही, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले.

नागपुरात नव्या पोलीस भवनाच्या भूमीपूजन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडकरींनी हे खडेबोल सुनावले. भूमीपूजन सोहळ्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे देखील उपस्थित होते. मंत्रालयातून शासनाने मंजूर केलेल्या कामासाठी निधी मिळवणे महाकठीण काम असते. मंत्रालयात बसलेले अनेक अधिकारी प्रत्येक कामात फक्त नकारात्मक सूर लगावतात. त्यामुळे विकासाची चालती गाडी पंक्‍चर होते, असे गडकरी म्हणाले.
नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही गडकरींनी याप्रसंगी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिव्हिल लाईन्स परिसरात सध्या असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जागीच पुढील काही महिन्यात या पोलीस भवनाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात राज्य सरकारने काही विभागातील भरती प्रक्रिया बंद केली असली तरी पोलीस भर्तीवर बंदी घातलेली नाही. गेल्या 3 वर्षात 30 हजार पदे भरली गेली असून पुढेही गरजेप्रमाणे पोलीस भरतीचे सर्वाधिकार पोलीस प्रमुखांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)