अधिकाऱ्यांच्या धडक मोहिमेने यंत्रणा खडबडून झाली जागी

शेवगाव: तालुक्‍यात दुष्काळाच्या तीव्र झळा असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कार्यरत असलेल्या सेवा सामान्य जनतेपर्यंत वेळेत पोहोचाव्यात, त्यात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून त्या अचानक तेही सुट्टीच्या दिवशी तपासण्याची मोहिम गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी अवलंबिल्यामुळे येथील सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून होणाऱ्या कारवाईचा त्यांनी धसका घेतला आहे.

सुट्टी असली तरी प्यायला पाणी लागते. सध्या पाण्याच्या तक्रारीही वाढल्या असल्याने भवारी यांनी सर्वप्रथम ही यंत्रणा तपासण्याचे ठरवले. रविवारी ( दि.23) सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक मोहीम सुरू झाली. विस्तार अधिकारी संजय जगताप यांना बरोबर घेऊन ते सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाहेर पडले, ते थेट राक्षी येथील टॅंकर भरतात त्या उद्भवावर पोहोचले, तेथून दिवसभरात कोणते टॅंकर कधी भरून गेले याची माहिती घेऊन हसनापूर, अधोडी, अंतरवली या गावचे भरून गेलेले टॅंकर कोठे आहेत? त्यांनी त्यांच्याकडे वाटपासाठी असलेल्या वाड्या-वस्त्यांवर पाणी टाकले की नाही याची तपासणी केली. त्यात वेळेचा अपव्यय करीत टंगळमंगळ करणारे तसेच निर्धारित पाणी देण्यात फेरबदल करत गरजेच्या ठिकाणी द्यावयाच्या पाण्यात परस्पर कपात करून अनावश्‍यक तेथे पाणी देण्याचा प्रकार तसेच दूरच्या वाड्या-वस्त्यांवरील वितरणात फेरबदल केल्याचा प्रकारही भवारी यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राक्षीच्या उद्भवावरून भरलेला अंतरवलीचा टॅंकर गावात पोहोचलाच नाही तर पूर्ण भरून गेलेला टॅंकर खानापूरला अर्धाच पोहोचला. अर्धा टॅंकर चालकाने परस्पर दूसरीकडेच रिकामा केल्याचे निदर्शनास आले. दोन्ही टॅंकरच्या पाणी वाहतूक संस्थेसह चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असल्याचे समजते.

कारवाई होणार का?
आता होणारी कारवाई तडीस जाते की, त्यांना कोणी पाठीशी घालून दडपली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अधिकाऱ्यांनी अशी कारवाई करून यंत्रणेवर अंकुश ठेवण्याची आवश्‍यकता असून भवारी यांची मोहिम स्तुत्य असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)