अधिकाऱ्यांचा छळ केल्याबद्दल भारताची पाकिस्तानकडे तक्रार 

शिख भाविकांना रोखल्याप्रकरणीही केला निषेध

नवी दिल्ली – इस्लामाबाद मधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा छळ केल्याच्या प्रकरणात भारताने पाकिस्तान सरकारकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच तेथील शिख भाविकांना त्यांच्या धार्मिक स्थळावर जाण्यास पाक सरकारने अडथळे आणल्याबद्दलही भारताने त्यांच्याकडे तक्रार नोंदवून निषेधही केला आहे.

या संबंधात भारताच्या विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी गुरूद्वारा नानक साहिब आणि गुरद्वारा सच्चा सौदा या धार्मिक स्थळी गुरूनानक जयंती निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी भारतीय दूतावासातील अधिकारी तेथे जाणार होते. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी विदेश मंत्रालयाकडून पुर्व परवानगीही घेतली होती. पण तरीही त्यांना त्या ठिकाणी अडथळे आणून मज्जाव केला गेला. त्याबद्दल पाकिस्तान सरकारकडे अधिकृतपणे निषेध नोंदवण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

-Ads-

पाकिस्तानातील गुरूद्वारा कर्तारपुर येथे जाण्यासाठी भाविकांना स्वतंत्र मार्ग सुरू करू देण्याचा करार कालच दोन्ही देशांमध्ये झाला आहे. त्याच वेळी हा प्रकार घडला आहे. या दोन धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारतातून जे शिख भाविक तिकडे गेले होते तेव्हा त्यांच्या समोर खलिस्तानीवादी फलक फडकवण्यात आले. शिख भाविकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न यातून केला गेला त्याचाही भारताने कडक शब्दात निषेध केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)