अधिकार वाढीसाठी शहर सुधारणा समितीचा हट्ट

पिंपरी – महापालिकेतील शहर सुधारणा समितीच्या सदस्यांना आपल्या अधिकारात वाढ करुन हवी आहे. अधिकारात वाढ करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी राज्यातील इतर महापालिकांमधील शहर सुधारणा समितीच्या अधिकाराची माहिती घ्यावी. त्याचा अहवाल सभेला सादर करण्यात यावा, असा ठराव समितीच्या सभेत करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात समित्या आहेत. त्यामध्ये स्थायी समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती आणि जैवविविधता व्यवस्थापन समिती अशा सात समित्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक अधिकार स्थायी समितीला असून स्थायी समिती शक्तीशाली समिती आहे. महापालिकेच्या आर्थिक चाव्या या समितीच्या हातात असतात. इतर समित्यांना अधिकार कमी आहेत. विषय समित्यांना अधिकार होते. परंतु, ते अधिकार महासभेने कमी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समित्यांना अधिकार नसल्यामुळे सदस्यांना महत्वाची कामे करता येत नाहीत. त्यामुळे सातत्याने विविध विषय समित्यांच्या सदस्यांकडून अधिकारात वाढ करुन देण्याची मागणी केली जात आहे. शहर सुधारणा समितीचे अधिकार सर्वसाधारण सभेने कमी केले आहेत. त्यामुळे समितीच्या अधिकारात वाढ करण्यात यावी. यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी इतर महापालिकांमधील शहर सुधारणा समितीच्या अधिकाराबाबतची माहिती घ्यावी. त्यांना कोणते अधिकार आहेत. याचा अहवाल महिन्याभरात समितीपुढे सादर करावा, असे समितीने आयत्यावेळी सदस्य प्रस्तावाद्वारे केलेल्या ठरावात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)