अधिकारी कारवाईत प्रशासनाचा दुजाभाव

स्थायी समिती बैठकीत संतप्त सदस्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी ;
सभापतींच्या उशीरा येण्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 4 – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे सुनील कोरगंटीवार यांना तडकाफडकी समाजकल्याण अधिकारीपदावरून कार्यमुक्त केले जाते. तर, दुसरीकडे पशुसंवर्धन अधिकरी श्रीराम पवार हे चौकशी अहवालात दोषी ठरूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अधिकाऱ्यांवर कारवाई करताना हा भेदभाव का? असा प्रश्‍न जिल्हा परिसद सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यामुळे बैठकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर कारवाई का केली याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदस्यांना सांगितले.

-Ads-

जिल्हा परिषदेत शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीची बैठक चांगलीच तापली होती. सुरवातीला सभापतींच्या उशीरा येण्याने विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल चढवला आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत, अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. यावेळी समाजकल्याण अधिकारी यांच्या तडकाफडकी बदलीबाबतचा विषय सदस्यांनी उपस्थित केला. कामधेनू योजनेमध्ये अफरातफर केल्याचा आरोप झालेल्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली.

त्या चौकशी अहवालात संबंधीत विभागाचे अधिकारी श्रीराम पवार हे दोषी असल्याचे सिध्द झाले आहे, असे असतानाही त्या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळत असलेले कोरगंटीवार यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले जाते, हा कुठला न्याय असा प्रश्‍न सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी खुलासा देत, सदस्यांना याबाबत माहिती दिली जाईल, असे सांगितले. दरम्यान, कोरगंटीवर यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)