पुणे मनपा : अधिकारी, कर्मचारी पितात आंघोळीचे पाणी 

महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील धक्कादायक प्रकार


स्वच्छ पाण्याला महापालिकेतच हरताळ

पुणे  : महापालिकेतील आयुक्तांपासून ते महापौरांपर्यंत आणि पालिकेच्या मुख्य इमारतीत दैनदिंन कामांसाठी आलेल्या नागरिकांपासून ते शिपायां पर्यंत पालिकेच्या मुख्य इमारती आलेल्या प्रत्येक नागरिकाला चक्क आघोंळ आणि कपडे धुतलले पाणी प्यावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लर्क्षामुळे ही स्थिती उद्भवलेली असून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. ज्या पाण्याच्या टाकीतून मुख्य इमारतीला पाण्याचा पुरवठा केला जातो. त्या टाकीवरच नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या कामावरील मजूर आंघोळी करत असून त्यावरच कपडेही धुवत आहेत. विशेष म्हणजे या पाण्याच्या टाकीच्या झाकणावरच हा प्रकार सुरू असल्याची छायाचित्रे दैनिक प्रभातच्या हाती लागती आहेत. त्यामुळे पुणेकरांना कोटयावधी रूपये खर्चून स्वच्छ पाणी देण्याचा दावा करणारी महापालिका आपल्याच इमारतीत अस्वच्छ पाणी पुरवठा करत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

टाकीवरच केली जाते आंघोळ
महापालिकेच्या भवन विभागाकडून मुख्य इमारतीचे विस्तारीत बांधकाम सुरू आहे. त्यात मागील बाजूस पुर्णत: नवीन इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे काम दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू करत असताना; त्या कामास जुनी पाण्याची टाकी अडथळा ठरत होती. त्यामुळे भवन विभागाकडून जुनी टाकी पाडण्यापूर्वी नवीन दोन टाक्‍या बांधण्यात आल्या. त्यातील एक टाकी वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्यानंतर नवीन टाकी जमीनदोस्त करण्यात आली. या नवीन टाकीतून सध्या जुन्या इमारतीस पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, त्याच वेळी या टाकीतील पाणी या बांधकामावर असलेले कर्मचारी आंघोळ तसेच कपडे धुवण्यासाठी वापरत आहेत. या नवीन इमारतीमध्ये काम करणाऱ्यासाठी काही कर्मचारी त्याच परिसरात राहतात, त्यांना पाणी तसेच इतर सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी सकाळी या टाकीमधून बादलीने पाणी काढून टाकीच्या झाकणाजवळच आंघोळी करतात, तर काही महाभाग याच ठिकाणी कपडे धुवतात, त्याचे पाणी पुन्हा टाकीत मिसळले जाते. नंतर हेच पाणी इमारतीच्या वरील टाकीत चढवून संपूर्ण मुख्य इमारतीला पाणी पुरवठा केला. धक्कादायक बाब म्हणजे या टाकीवर मोठया प्रमाणात राडारोडा आणि मातीही टाकण्यात आलेली असल्याचे चित्र आहे.

-Ads-

मुख्य इमारतीकडेच दुर्लक्ष

महापालिकेच्या मुख्य इमारतीकडेच या इमारतीची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या भवन विभागाचे अक्षम्य दुलर्क्ष असल्याचे समोर आले आहे. या पूर्वीही अधिकारी पाणी पित असलेल्या वॉटर कुलरमध्ये झुरळांचा वावर असल्याचे वृत्त प्रभातने समोर आणले होते. त्यानंतर प्रशासनाने सर्व मजल्यांवरील पाण्याचे कुलर जवळपास बंदच केलेले आहेत. त्यानंतर अता तर चक्क पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरच आंघोळी केल्या जात असल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. याच टाकीतील पाणी सर्व अधिकारी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना पिण्यासाठी दिले जात असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, या टाक्‍यांची क्षमता किती, त्याचे पाणी स्वच्छ असते का, सुरक्षेसाठी काय उपाय योजना आहेत का याची कोणतीही माहिती संबधित अधिकाऱ्यास देता आली नाही.

What is your reaction?
27 :thumbsup:
5 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
8 :cry:
18 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)