अधिकमास… (कलंदर)

– उत्तम पिंगळे 

(स्थळ वर्षा बंगला मुंबई)
मुख्यमंत्री : (फोनवर बोलत घरात शिरतात) बरोबर योग्य तो निर्णय घ्या.
अमृताताई : म्हटलं आज तरी वेळेवर येताय की नाही?
मुख्यमंत्री : हं बोला काय विशेष?
अमृताताई : विशेष काय? तुमच्या एवढ्या बीझी शेड्यूलमध्ये पूर्ण अधिक मास संपून गेला. महिन्याभरात नागपूरला अपलं घरी जाणं न झाल्याने शेवटी माझ्या आईने आधिक महिन्याचे जावयाचे वाण पार्सलने पाठवलं आहे.
मुख्यमंत्री : काय करणार एक तर निवडणूक निकाल शेतकरी आंदोलन…
अमृताताई : ते रोजचेच आहे. इकडे पावसाचा नेम नाही म्हणून पार्सल पाठवले आहे.
मुख्यमंत्री : हो हो बरं, हं, काय पाठवले आहे?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमृताताई : मी पाहिलेलं आहे तुम्हीच ओळखा पाहू? (इतक्‍यात फोन वाजतो)
मुख्यमंत्री : काय ड्रायव्हर वरील गंभीर गुन्हे सोडून बाकी कारवाई मागे . .हं हं पक्षीय राजकारण सोडून निर्णय घ्या.(फोन ठेवतात)
अमृताताई : आधी तो फोन जरा बंद ठेवा पाहू?
मुख्यमंत्री : ठीक आहे (फोन बंद करतात) हं. ते काय तेहेतीस वस्तू द्यायच्या असतात नं?
अमृताताई : हो तसेच काहीसं
मुख्यमंत्री : मागे एकदा ते काही 33 अनारसे वगैरे दिले होते.
अमृताताई : चूक अजून एक चान्स. एक गोड व एक तिखट वस्तू आहे.
मुख्यमंत्री : गोड म्हणजे लाडू… व पुडाच्या वड्यात असतील.
अमृताताई : एक बरोबर, एक चूक. 33 पुडाच्या वड्या व 33 संत्रा बर्फी, सोन्याची अंगठीही!
मुख्यमंत्री : काय? 33 अंगठ्या आहेत.

अमृताताई: 33 नाही हो; एकच आहे पण पहा.
मुख्यमंत्री : अरे वा. छान अगदी हुबेहूब कमळासारखी अंगठी आहे. या पण 33 हव्या होत्या.
अमृताताई : अरे वा. पण जरा नीट पाहा त्यात कमळाचे परागकण आहेत, ते बरोबर 33 आहेत.
मुख्यमंत्री : (चक्क मोजतात) वा! खूप छान.
अमृताताई : सोबत आईने चिठ्ठी लिहिलेली आहे व तुमच्याकडून एक मागणी मागितली आहे.
मुख्यमंत्री : (दचकून) काय बरे?
(अमृताताई चिठ्ठी देतात. त्यात लिहिलेले असते की, “जावईबापू अनेक आशीर्वाद. अधिक महिन्याला 33 चे महत्त्व असते म्हणून विधानसभेत 33 टक्के महिलांसाठी आरक्षण मिळवून देण्याचे विधेयक दिल्लीत मंजूर करून घ्यावे. मुख्यमंत्री (मनांत मिलियन डॉलरचा प्रश्न) ताबडतोब उत्तर लिहीतात. यावेळी प्रापंचिक मागणीलाही ते टिपिकल सरकारी उत्तर देतात की, “निश्‍चित अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊच. दंडवत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)