अधिकमासाच्या महिन्याला भक्तीची आस

ठिकठिकाणी सप्ताह आयोजित : भागवत कथा निरुपण
भाविनिमगाव – तीन वर्षांतुन एकदा येणारा अधिकमासाचा ( धोंडा) महीना जावई लोकांसाठी एक पर्वणीच सहकुटुंब सहपरिवार सासुरवाडीला पाहुणचारासाठी जाणे येणे ही पुर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
नवीन लग्न झालेल्या जावई मंडळींना तर आग्रहाचे निमंत्रण सहपरिवारासाठी असते. मात्र मुलीकडील मंडळींचा मोठा खर्च या निमित्ताने होत असतो. पण मुलींसाठी वडील सर्व काही सहन करून हा त्रैवार्षिक सण साजरा करतोय. आपुलकीने साजरा होणारा हा अधिकमासाचा महीना अनेक प्रकारे साजरा होतो. दोन पारीवारीक कुटुंबातील कार्यक्रमाची ही परंपरा आहे.
मात्र अनेक गावात या अधिकाच्या महिन्याला आता आता थोडे वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. अनेक गावांनी पुढाकार घेऊन अधिक मासाचा हा महीना सार्वजनिक केल्याचे दिसते आहे. कारण एक महिना चालणारा हा अधिकमास धार्मिक कार्यक्रमाने अनेक गावात साजरा केला जात आहे. सप्ताहाचे रूप या काळात येत आहे. भजन, कीर्तन, हरिपाठ व विविध ग्रंथाचे कथावाचन या काळात होत असुन नामवंत महाराजांचे सुश्राव्य असे कथानक ऐकण्यास गाव मंडळी एकत्र येत असून एक प्रकारचा धार्मिक कार्यक्रम मोठे स्वरूप अलीकडच्या काळात धारण करत असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे या काळात श्रीमतद्‌ भागवत कथा वाचणाचा कार्यक्रम अनेक गावांमध्ये या वर्षी नव्याने सुरू झाला असल्याचे समजते.
यामध्ये भगवान श्रीकृष्ण चरीत्र त्यांनी संसारीक जगामध्ये लोककल्याणाकरीता वेळोवेळी घेतलेले अवतार याचे निरुपण या काळात होत असुन इतरही धार्मिक कार्यक्रम या बरोबर ठिकठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी गाव भोजणाची व्यवस्था ही अनेक जन एकत्र येऊन करताना दिसतात तर काही ठिकाणी गाव वर्गणीतुन हा कार्यक्रम सुरू असल्याचे समजते. अधिक मासाचा हा महीना अनेक गावांत सार्वजनिक स्वरूपात साजरा होत असल्याचे दिसत आहे. एकुणच हा अधिक मासाचा महीना भक्तुमय वातावरणात पार पडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)