अद्रमुकची भाजपशी युती अजून अधांतरीच

चेन्नाई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात अद्रमुक पक्ष भाजपशी युती करणार असल्याचे संकेत पक्षाच्याच मुखपत्रातून देण्यात आले असले तरी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी मात्र त्यावर सावध प्रतिक्रीया देताना या विषयी पक्षाचे हायकमांडच निर्णय देतील अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे ही युती अजून अंधातरीच आहे असे दिसून आले आहे.

पक्षाचे संसदेतील नेते थंबी दुराई यांनी तर म्हटले आहे की एखाद्या मुखपत्रातील स्तंभ लेखक एखाद्या राजकीय पक्षाच्या युतीचा निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाचे वरीष्ठ नेतेच यावर निर्णय घेतील. युती विषयी निर्णय घेण्याची ही वेळ नाही. प्रत्यक्ष निवडणुकीची प्रकिया सुरू झाल्यानंतरच यावर निर्णय होईल असे ते म्हणाले. राज्यातील एक मंत्री डी जयकुमार यांनीही अशीच प्रतिक्रीया दिली आहे.

-Ads-

भाजप आणि अद्रमुक ही युती डबल बॅरल बंदुकीप्रमाणे परिणामकारक सिद्ध होईल असा विश्‍वास पक्षाच्या मुखपत्रातील एका लेखात व्यक्त करण्‌यात आला होता. त्यावरून दोन्ही पक्षांची आघाडी निश्‍चीत झाल्याचे मानले जात असतानाच पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी वरील वक्तव्ये केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये निर्माण झालेले हे बंध आता कोणी कमकुवत करू शकत नाहीं असेही या लेखात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उचांवल्या होत्या. त्यावर बोलताना थंबीदुराई म्हणाले की अजून तरी अद्रमुक आणि भाजप यांच्यात कोणताही राजकीय करार झालेला नाही.

आम्ही संसदेतही स्वतंत्र पक्ष म्हणून कार्य करीत असून तामिळनाडुच्या हिताच्या आड, येणाऱ्या केंद्राच्या धोरणांना आमचा विरोधच राहील असे त्यांनी स्पष्ट करून या विषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)