अद्याप लोकायुक्तांची नियुक्त का नाही?- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : राज्यात अद्याप लोकायुक्तांची नियुक्ती का करण्यात आलेली नाही? तसेच ही नियुक्ती कधीपर्यंत करण्यात येईल? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील १२ राज्यांच्या मुख्य सचिवांना  विचारला आहे. न्या. रंजन गोगोई आणि आर. भानुमती यांच्या खंडपीठाने हा सवाल केला आहे. एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने हा सवाल केला आहे.

जम्मू-काश्मिर, मनिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुदुच्चेरी, तामिळनाडू, तेलंगाणा, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या १२ राज्यांकडे सर्वोच्च न्यायालयाने लोकायुक्त का नियुक्त केलेले नाहीत याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.  वकील आणि भाजपाचे नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रपतींच्या मान्यतेने १ जानेवारी २०१४ मध्ये हा कायदा करण्यात आला. जो १६ जानेवारी २०१४ पासून लागू करण्यात आला. मात्र, तेव्हापासून अद्यापपर्यंत काही राज्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. त्याचबरोबर अनेक राज्यांनी सक्षम लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी त्यांना पुरेसा निधी, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आपल्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने त्या राज्यातील लोकायुक्त हे पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत, असे या याचिकेत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)