अद्यापही आपल्याकडेच बहुमत असल्याचा पदच्युत पंतप्रधान विक्रमसिंघे यांचा दावा 

कोलंबो: श्रीलंकेतील राजकीय पेचप्रसंग अद्याप कायम असून पदच्युत करण्यात आलेले त्या देशाचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्याकडे अद्यापही बहुमत असून ते सिद्ध करण्यासाठी श्रीलंका संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी केली आहे. काल अध्यक्ष मैथरीपाला सिरीसेना यांनी विक्रमसिंघे यांना पदच्युत करून महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान म्हणून घोषित केल्यानंतर हा पेच प्रसंग निर्माण झाला आहे.
विक्रमसिंघे यांनी संसदेचे सभापती करू जयसुर्या यांच्याकडे अर्ज करून संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असली तरी अजून त्यांच्या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नियोजित कार्यक्रमानुसार देशाच्या अर्थसंकल्पासाठी संसदेचे 5 नोव्हेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्याच्या आत हे विशेष अधिवेशन व्हावे अशी त्यांची मागणी आहे. आपल्याला बडतर्फ करून आपल्या जागी महिंदा राजपक्षे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. देशाचे नवे पंतप्रधान म्हणून राजपक्षे यांनी कालच आपल्या पदाची शपथ घेतली आहे.
श्रीलंकेची संसद 16 नोव्हेंबर पर्यंत निलंबीत 
दरम्यान रानील विक्रमसिंघे यांनी संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली असतानाच अध्यक्ष सिरीसेना यांनी त्या देशाची संसदच 16 नोव्हेंबर पर्यंत निलंबीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथील राजकीय पेच प्रसंग आणखीनच गंभीर बनला आहे.
कालच पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले महिंदा राजपक्षे यांना बहुमत प्राप्त करण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठीच अध्यक्षांनी हे पाऊल उचलले असावे असे सांगितले जात आहे. 225 सदस्यांच्या श्रीलंका संसदेत राजपक्षे आणि सिरीसेना यांच्या आघाडीला फक्त 95 जागा आहेत. तर पदच्युत पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या पक्षाकडे 106 खासदारांचा पाठिंबा आहे. तथापी त्यांनाहीं बहुमतासाठी 7 जागांची गरज आहे. अध्यक्षांनी संसद तात्पुरतील निलंबीत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता तेथील सरकारचे भवितव्य 16 नोव्हेंबर नंतरच निश्‍चीत होईल असे सांगितले जाते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)