आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या उभारणीचे काम सुरू

नवी दिल्ली – उत्तराखंड मधील केदारपुरी येथील आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या फेरउभारणीचे काम पुन्हा सुरू झाले आहे. जेएसडब्यु उद्योग समुहाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2013 साली उत्तराखंडात आलेल्या पुराच्या भयानक आपत्तीच्या काळात आदि शंकराचार्यांच्या समाधीच्या परिसराचे तसेच तेथील त्यांच्या मठाचे मोठे नुकसान झाले होते. आज दिवाळीच्या पवित्र मुहुर्तावर जेएसडब्यु उद्योग समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांच्या हस्ते या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. या ठिकाणी या समुहातर्फे आदि शंकराचार्यांच्या जीवनावर आधारीत एक संग्रहालयही उभारले जाणार आहे.

समाधी आणि संग्रहालय या दोन्हींचे काम येत्या दोन वर्षांत पुर्ण करण्याचा उद्योग समुहाचा संकल्प आहे. प्रलयात केदारनाथ परिसरात बरेच नुकसान झाले आहे. तेथील पुनर्ररचनेच्या कामाच्या संबंधात उत्तराखंड सरकारने जेएसडबल्यु उद्योग समुहाशी गेल्याच वर्षी करार केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)