अदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा – कॉंग्रेस

नवी दिल्ली – सरकारी अनास्थेमुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे उत्तरप्रदेशात गोरखपुर येथे गेल्या चार पाच दिवसांत अनेक बालके दगावली आहेत. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथसिंह यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस सरचिटणीस गुलामनबी आझाद यांनी केली आहे.

48 तासांच्या अवधीत या बालकांना लिक्वीड ऑक्‍सीजनचा पुरवठा होऊ शकला नाही म्हणून राघवदास मेडिकल कॉलेजमधील 30 बालके दगावली हा संतापजनक प्रकार आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी मुळे आणि पुर्ण बेफिकीरीमुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीमाना दिला पाहिजे असे ते म्हणाले. कॉंग्रेसचे आणखी एक नेते मनिष तिवारी यांनीही अदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)