अदानी समूहाचा नफा झाला कमी 

पहिल्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात घट 
कंटेनर आणि क्रूडच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम 
नवी दिल्ली: अदानी पोर्टस ऍण्ड स्पेशल आर्थिक क्षेत्रामधील जून तिमाहीतील कंपनीच्या फायद्यात 9 टक्‍क्‍यांची घट नोंदवण्यात आली कंपनीचा नफा 697 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2017-2018 च्या पहिल्या तिमाहीत 767.52 कोटी रुपयांचा निव्वळ फायदा मिळाला होता. कंपनीच्या एकूण महसुलावरही या तिमाहीत परिणाम झाला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
जून तिमाहीत कंपनीला एकूण खर्च 1 हजार 781.46 कोटी रुपयांचा झाला आहे. वर्षभरात हाच आकडा 1 हजार 867.43 कोटी खर्चाची नोंद करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनी टर्मिनल व इतर कामात खर्च करण्यात आल्याच्या कारणांमुळे फायद्यात 9 टक्‍के घट झाली असून यात कच्च्या तेलाच्या किमती आणि कंटेनरच्या वाढलेल्या किमती यांचा परिणाम झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्याचबरोबर 30 जून 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीत अदानी पॉवर कंन्स्लटन्टला निव्वळ तोटा 82 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून तो तोटा 825.15 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरात तिमाहीमध्ये झालेला एकूण तोटा 452.84 कोटी रुपये झाला आहे. कंपनीला एकूण उत्पन्नात घट होऊन ते 3959.40 जून तिमाहीत पोहोचले आहे. हेच वर्षभर 5601.25 कोटी होते. आगामी काळाबाबत कंपनी आशावादी आहे. या कारणामुळे या समूहातील कंपन्यांच्या शेअरची काल विक्री होऊन शेअरचे भाव कमी झाले होते. मात्र आज कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच सुधारणा झाल्याचे आढळून आल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)