अदम्य कर्तृत्वाने जवान देशाचे नाव उज्ज्वल करतील

मेजर जनरल नवनीत कुमार : 421व्या तुकडीच्या 272 जवानांचा शपथग्रहण सोहळा

नगर – लष्करी गणवेष हा एक धर्म असून तो व्यक्तीगत धर्मा अगोदर निभावण्याची जबाबदारी या जवानांनी आज स्विकारली असून ते प्रसंगी प्राणांची आहुती देवून हि जबाबदारी पार पाडतील. तसेच अदम्य कर्तृत्वाच्या जोरावर ते आपल्या रेजिमेंटचे, देशाचे नाव उज्ज्वल करतील. असा विश्‍वास मेजर नवनीत कुमार यांनी व्यक्त केला. प्रसंग होता एमआयआरसी मधील 421व्या तुकडीच्या 272 जवानांच्या शपथग्रहण सोहळ्याचा. सकाळची बोचरी थंडी, एकसारख्या गणवेषात सैन्यात नव्याने दाखल झालेले जवान, लष्करी बॅन्डच्या तालावर एकसारखी पडणारी त्यांची पावलं आणि प्रेक्षागृहात बसलेले त्यांचे पालक, काही वेळातच या जवानांनी देशसेवेची शपथ घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत माता कि जयचा नारा घुमला प्रत्येकासाठीच हा क्षण अभिमानाचा होता. एम आय आर सीतील अखौरा ड्रील मैदानाचा सारा परिसर लष्करी अधिकारी आणि सैन्यात नव्याने रुजू होवू पाहणाऱ्या जवानांच्या पालकांनी फुलून गेला होता. या सोहळ्यासाठी जी ओ सी दक्षिण महाराष्ट्र सब एरियाचे समीक्षा अधिकारी मेजर जनरल नवनीतकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कर्नल विनायक शर्मा, कर्नल रसल डीसूझा आणि ब्रिगेडीयर व्ही.व्ही.सुब्रमण्यम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मेजर जनरल नवनीत कुमार यांनी या परेडचे निरीक्षण केले.

छत्तीस आठवड्याच्या कठोर प्रशिक्षणानंतर सैन्यात दाखल होवू पहाणाऱ्या या जवानांना आकाश, समुद्र आणि भुमी जिथे देशसेवेसाठी पाठविले जाईल तेथे प्रामाणिकपणे प्राणाची बाजी लावून देशसेवा करण्याची शपथ या जवानांनी आपआपल्या धर्माच्या ग्रंथांवर हात ठेवून देण्यात आली. परेड कमांडर मेजर अभिषेक झा यांनी हि शपथ जवानांना दिली. याप्रशिक्षणा दरम्यान सर्व क्षेत्रात नैपुण्य दाखविणाऱ्या गोपालसिंह या जवानास जनरल सुंदरजी गोल्ड मेडलने गौरविण्यात आले. तर अखिल कृष्णन या जवानाला जनरल के एल डीसूझा सिल्व्हर मेडलने तर प्रतिक या जवानास जनरल पंकज जोशी यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मेहर जनरल नवनीत कुमार यांनी सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या.या जवानांनी सादर केलेल्या परेडचे प्रदर्शन अव्वल दर्जाचे होते असे मेजर जनरल नवनीत कुमार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. या दिमाखदार सोहळ्या नंतर शहिद स्मारकाजवळ जाऊन तेथे दोन मिीटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतरझालेल्या कार्यक्रमात सैन्यात नव्याने दाखल झालेल्या जवानांनी आपल्या आई वडिलांचा गौरव पदक देवून त्यांचा सन्मान केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)