अथर्व कोकणेच्या प्रयोगाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील चिंचोली-कोकणे येथील जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व आनंद कोकणे याने बनविलेल्या रोप लावणे यंत्र साहित्य प्रयोगाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक विजय हगवणे यांनी दिली. भोर तालुक्‍यातील नसरापूर (बनेश्‍वर) येथील अमृता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांनी भाग घेतला होता. इन्सपायर ऍवॉर्ड योजने अंतर्गत अथर्व आनंद कोकणे याला प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रोप लावणे यंत्र साहित्य प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक पी. आर. फुंदे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष रामदास घोलप, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी अथर्व कोकणे याचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)