अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा पिंपरी-चिंचवडकरांना लाभ

पिंपरी – अॅकॉर्ड ग्रुपने भोसरी येथील संत ज्ञानेश्‍वर रुग्णालय आपल्या समुहात समाविष्ट केले आहे. त्यामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लाभ पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे.

भोसरी, मोशी, नाशिक महामार्ग परिसरातील हे सर्वाधिक क्षमतेचे रुग्णालय असून ते सर्व सोई सुविधांनी सज्ज आहे. अॅकॉर्ड हे मल्टि स्पेशिलिटी रुग्णालय असून यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग चिकित्सक, मनोचिकित्सा, त्वचारोग तज्ज्ञ, न्युरोलॉजी, ईएनटी, ओबस्टेट्रीक्‍स, ऑर्थोपेडिक्‍स, शस्त्रक्रिया आदी सेवांचा समावेश आहे.

-Ads-

ओपन हार्ट सर्जरी, आयव्हीएफ, बॅरिएट्रीक सर्जरी, कॅन्सर केअर युनिट यासारख्या सुविधांचा समावेश ऍकॉर्ड एसडीएच रुग्णालयाने नव्याने केला आहे. अॅकॉर्ड मेडीप्लस ग्रुपकडून सहा राज्यांमध्ये मल्टी स्पेशिलिटी रुग्णालयांची साखळी तयार करत असून यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पंधराशे खाटांचा समावेश आहे. अॅकॉर्ड एसडीएच हे या समुहातील दुसरे रुग्णालय आहे. बाणेर-पुणेमध्ये अडीचशे खाटांच्या नवीन रुग्णालयाचे काम 2019 मध्ये पुर्ण होईल, अशी माहिती अॅकॉर्ड हॉस्पिटल्सच्या वतीने देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)