अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पाटण – तालुक्‍यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर आंब्रुळे येथील एकाने त्याच्या राहत्या घरी जबरदस्तीने शारिरीक अत्त्याचार केल्याची फिर्याद पाटण पोलिसात दाखल झाली आहे. याप्रकरणी राहुल शंकर भाकरे रा. आंब्रुळे, ता. पाटण याचेवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पिडीताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल भाकरे याने त्याच्या घरी कोणी नसताना मला बोलावून घेतले. माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. मी नकार देत असताना सुध्दा मला लग्नाचे अमिष दाखवून माझ्यावर जबरदस्तीने अत्त्याचार केला. सदर पिडिता 18 आठवड्यांची गर्भवती असून सध्या कराड येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक दीपाली शिंदे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)