अत्याचार करून “बाबा’ बनणाऱ्या भोंदूला अटक

पिंपरी – श्रीगोंदा येथे एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार करुन वेष बदलून फिरणाऱ्या भोंदूला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे.

भाग्या उर्फ भागवत चव्हाण (वय-70, रा. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्या याने 8 जानेवारी 2018 रोजी श्रीगोंदामध्ये एका गतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्यानंतर तो तेथून फरार होता. गुन्हे शाखेचे हवालदार दादा पवार यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत भाग्या हा पिंपरी-चिंचवड हद्दीत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने काही माहिती दिली नाही. मात्र श्रीगोंदा पोलिसांकडे चौकशी केली असता भाग्यावर गुन्हा दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेने भाग्याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, भीमसेन सांडभोर, पोलीस हवालदार दादा पवार, संजय गवारे, धनराज किरणाळे, धर्मराज आवटे, हजरत पठाण, मयुर वाडकर, चेतन मुंढे, तुषार शेटे, राजाबाऊ बारशिंगे आदींनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)