अत्याचारी नराधमाच्या पुतळ्याचे दहन

कर्जत – शेवगाव तालुक्‍यातील हातगाव कांबी येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. तसेच, येथील मुख्य चौकात कर्जतमधील नाभिक समाजाचे तरुण व कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अत्याचार करणाऱ्याच्या पुतळ्याचे दहन केले.

हातगाव कांबी येथील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गुन्हेगारांकडून या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे हे कुटुंब भयभीत अवस्थेत तेथे राहत आहे. या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, त्यांचे तातडीने पुनर्वसन शहरात करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. निवेदनावर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)