अत्याचाराच्या निकालासाठी “स्पेशल कोर्ट’ आवश्‍यक – बच्छाव

पिंपरी – देशात दिवसागणिक महिलांच्या अत्याचारात वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. गुन्हेगारांवर कायद्याविषयी वचक बसण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतरची प्रक्रिया गतीमान व्हावी. यासाठी विशेष न्यायालयाची (स्पेशल कोर्ट) निर्मिती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांच्या वागणुकीमुळे देश हादरत आहे. एकीकडे आपण महासत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहोत. तर दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. देशाची शान देशाची मान राखण्यासाठी अशा अपमानकारक व लज्जास्पद घटनांना आळा बसणे ही काळाची गरज आहे. त्यासंबंधी सरकारने या बाबींचा विचार करणे आणि मुख्य म्हणजे कृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे बलात्कारी प्रवृत्तींच्या लोकांच्या मनात कायद्याविषयी भीती निर्माण होऊन चुुकीच्या घटना थांबतील. शासनाने आता कठोर कारवाई करणे महिलांच्या हिताचे असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)