अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महासभा तहकूब

पिंपरी – कासारसाई येथे दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ,तर एच ए मैदानात गुरुवारी पिंपरीतुन बेपत्ता असलेल्या एका सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेचा निषेध करत, पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणावर टीका करत महापालिका सभा अर्ध्या तासाकरिता तहकूब करण्यात आली.

सीमा सावळे यांनी तहकुबीची सूचना मांडली. आशा शेडगे यांनी अनुमोदन दिले. तत्पूर्वी या विषयावर मंगला कदम, सीमा सावळे, मीनल यादव, राजू बनसोडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुजाता पालांडे, भाऊसाहेब भोईर, एकनाथ पवार यांनी चर्चा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)