अत्याचाराच्या घटनांचा अपना वतनकडून निषेध

वाकड – महिला आणि लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी अपना वतन या सामाजिक संस्थेकडून वाकड निदर्शने करण्यात आली. संस्थेच्या वतीने वाकड चौक ते वाकड पोलीस ठाणे असा मोर्चा काढण्यात आला.

मुली आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या, अशी मागणी यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी केली. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी व अशा सामूहिक बलात्काराच्या घटनांसंदर्भात कडक कायदा अमलात आणावा. हे निवेदन वाकड पोलिसांमार्फत राष्ट्रपती, जम्मू काश्‍मीर, गुजरात, उत्तरप्रदेशच्या राज्यपालना पाठविण्याची विनंती करण्यात आली.

या आंदोलनामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे ,शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, परिवर्तनवादी संघटनेचे इम्रानभाई शेख, जमात उलेमा ए हिंद चे हाजी गुलजार शेख, शेतकरी कामगार पक्षाचे नाना फुगे, अखिल भारतीय छावा संघटनेचे धनाजी येलकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, शिव व्यापारी सेनेचे युवराज दाखले, योद्धा फाउंडेशनचे साकी गायकवाड, नितीन पाटेकर, मुजफर इनामदार , गणेश हिंगडे, विशाल वाघमारे, मसूद शेख, आकाश कांबळे, संदीप पिसाळ ,संतोष शिंदे, पूजा सराफ, संगीत शहा, बेटींना दास यांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)