अत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मध्ये झाला ‘मुकमोर्चा’

जामखेड : कथुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराच्यासह राजस्थान, उत्तर प्रदेश व देशातील महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ जामखेड मधील नागरीकांच्या वतीने भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. आज दुपारी तीन वाजता खर्डा रोड कॉर्नर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दु शाळेपासून मुकमोर्चास सुरवात होऊन मोर्चा शांततेत तहसील कार्यालयावर गेला. महिला सक्षमीकरण व सर्वधर्म समभाव चालना देण्यासाठी तसेच या घटनेतील गुन्हेगारांना सरकारने कडक शिक्षा करावी, यासाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा मध्ये जामखेड तालुक्यातील सर्व धर्मिय नागरिकांसह विविध सामाजिक संस्था व संघटना सहभागी झाल्या होत्या.

समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. काश्मीर पासुन ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील मुली सुरक्षित नाहीत. बलात्कारासाठी कडक कायदा झाला पाहिजे, यासाठी संविधानात बदल केला पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे नक्कीच पण आम्हाला कायद्यात बदल पाहिजे, या मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या मागण्या होत्या. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष गोरख दळवी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, लोकअधिकार आंदोलनाचे अध्यक्ष अॅड. अरुण जाधव, शहाजी राळेभात, मौलाना इबादुल रहेमान, मौलाना अफजल कासमी, मौलाना खलील अहमद  यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)