अत्याचारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी)
इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विध्यार्थीनीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एका शिक्षकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने साताऱ्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातारा शहराजवळील एका गावात असलेल्या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयीत आरोपी असलेला शिक्षक व फिर्यादीची ओळख ती इयत्ता सातवीत असताना झाली होती. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये त्या हायस्कूलची सहल गेली होती त्या दरम्यान तक्रारदार व आरोपी यांची ओळख अधिक झाली व त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिल्याने त्यांच्यातला संपर्क अधिक वाढला होता. सहलीच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकाने शाळेच्या एका खोलीत तिचे चुंबन घेतले. संशयीत शिक्षक हा तक्रारदार मुलीला शनिवार रविवार या सुट्टीच्या दिवशी कास, यवतेश्‍वर या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा व तिथेच तिच्यावर अत्याचार करायचा तसेच एकेदिवशी तर त्या शिक्षकाने त्याच्या राहत्या घरी अत्याचार केल्याचे असे तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी रात्री उशीरा या घटनेचा गुन्हा सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला असून संशयीत आरोपी असलेल्या शिक्षकाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेलते होते.दरम्यान या घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गावकऱ्यांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)