‘अत्याचार’प्रकरणाचे निकाल वेळेत लागावेत – सुप्रिया सुळे

दोषींना फाशी झालीच पाहिजे

पुणे- महिलांच्या अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणाचे निकाल एका विशिष्ट वेळेत निकाली काढले जावेत आणि अशा घटनांवर व्यापक चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केली. येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

महिला अत्याचारातील दोषीला फाशीची शिक्षा नसावी, अशी मागणी पुढे येत आहे. परंतु, आम्ही केंद्रीय महिला कमिटीने या मागणीविरोधात एक पत्र दिले आहे आणि त्यात फाशीची शिक्षा तर असावीच. तसेच हे अत्याचाराचे गुन्हे एका विशिष्ट वेळेत लवकर निकाली काढावेत, असे त्यात नमूद केले आहे. आरोपीला कायद्याची भीती असलीच पाहिजे. शिवाय दहशवादी, गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारालाही फाशी झालीच पाहिजे, अशा मताची मी आहे.

-Ads-

न्याय यंत्रणेत काहीतरी चुकीचे घडतेय
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी आजपर्यंत कधीही पत्रकार परिषद घेतली नव्हती. त्यांना पत्रकार परिषद घेऊन आपले राजिनामे द्यावे लागतात, म्हणजे नक्‍कीच यंत्रणेत काही तरी चुकीचे घडत आहे. त्यांनादेखील योग्य पद्धतीने न्याय देण्यास अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळतो आहे का? याबाबत विरोधकांनाच काय भाजपमधील काही नेत्यांनादेखील विचारा, अशी टिप्पणी त्यांनी केली.

उत्तमनगर येथे उद्या जनआंदोलन
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षचा निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्ष घेईल, असे सांगत सुळे म्हणाल्या, मेट्रो, बीडीपी आणि शहरातील कचरा प्रश्‍नासंदर्भात येत्या आठवड्यात नवनियुक्‍त आयुक्‍तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रशासनाकडून स्थानिक ग्रामस्थांना सहकार्य केले जात नाही. या त्रासातून सुटका व्हावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 25 एप्रिल रोजी उत्तमनगर एनडीए गेट येथे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

इंदापूर येथील घटना दुर्देवी
पाण्यावरून शेतकरी आत्महत्या करतात. इंदापूरमध्ये झालेली घटना दुदैवी आहे. पाणी हा गंभीर विषय आहे. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. मात्र, कर्जासाठी बॅंकेकडून तगादा लावणे चुकीचे आहे. सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, या आत्महत्येची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)