अतुलबाबांच्या कार्याचा प्रभाव पंढरीत आल्यानंतर जाणवतो

पंढरपुरमध्ये “माऊली’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेता रितेश देशमुख यांचे भावोद्‌गार

कराड – पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिर समितीने गेल्या वर्षभरात मोठे काम केले आहे. अतुल भोसलेंकडून नेहमी प्रवासामध्ये किंवा कौटुंबिक कार्यक्रमात त्याची माहिती मिळते. पण आज पंढरपुरात प्रत्यक्ष आल्यानंतर अतुल भोसले यांनी केलेल्या उत्तुंग कार्याचा प्रभाव नक्कीच जाणवतो, असे भावोद्‌गार अभिनेता रितेश देशमुख याने काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“लयभारी’ या सिनेमाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुखचा “माऊली’ हा नवा मराठी सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने “माऊली’ची सगळी टीम पंढरपुरात आली होती. अभिनेता रितेश देशमुखसह जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सयामी खेर यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांच्यावतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

रितेश देशमुख म्हणाले, कर्तृत्वाचा ध्यास आणि विकासाची दूरदृष्टी असेल तरच चांगली कामे उभी राहू शकतात. आत्तापर्यंत विविध कौटुंबिक कार्यक्रमात भेट झाल्यानंतर अतुल भोसलेंकडून पंढरपुरात मंदिर समितीमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती मिळायची. पण आज प्रत्यक्ष येथे भेट दिल्यानंतर मंदिर समितीकडून गेल्या वर्षभरात राबविलेले उपक्रम आणि वारकरी भाविकांना दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम सेवा पाहिल्यानंतर डॉ. भोसले यांनी केलेल्या कार्याचा प्रभाव प्रत्यक्ष अनुभवता आला. याप्रसंगी मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ऍड. माधवी निगडे, व्यवस्थापन बालाजी पुदलवाड भावीक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)