अतिवृष्टीमुळे चीनमधील त्सांग्पो नदीला पूर

अरुणाचल, आसाममध्ये सतर्कतेचा इशारा

गोवाहटी – चीनमधील त्सांग्पो नदीला अतिवृष्टीमुळे प्रचंड पूर आला असल्याने अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्येही पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशातील पूर्व भागातील सियांग जिल्ह्यामध्ये पूर येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

चीनमधील त्सांग्पो नदीपात्राच्या भागामध्ये गेल्या 50 वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ही नदी पुढे अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सियांग जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे लोहित आणि दिबांग या अन्य दोन नद्यांचे प्रवाह या नदीला येऊन मिळतात. या तिन्ही नद्यांच्या प्रवाहातूनच ब्रम्हपुत्रा नदी आकारास येते. या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्गाचे पाणी येण्याची शक्‍यता असल्याने अप्पर सियांग जिल्ह्यात नदीच्या दोन्ही बाजूच्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. त्सांग्पो नदीमध्ये 9 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्सांग्पो नदीमधून 8 हजार क्‍युसेक विसर्ग 15 दिवसांपूर्वीच सुरू झाला होता.

त्सांग्पो नदीच्या पूरामुळे अरुणाचल पाठोपाठ आसाममध्येही मोठ्या पूराची शक्‍यता निर्माण झाली आहे. दिब्रुगढ जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अतिसावधानतेचा इशारा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)