अतिरिक्‍त फुलांच्या आवकेसाठी जागा द्या

 फूल बाजारातील व्यापाऱ्यांचे प्रशासनाकडे साकडे

पुणे – नवरात्रोत्सव, दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फूल बाजारात होणाऱ्या अतिरिक्‍त फुलांच्या आवकेसाठी आणखी जागा देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे. याचबरोबर अवकाळी पावसाची शक्‍यता, 24 तास सुरू राहणारी आवक लक्षात घेता बाजारात तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री टाकण्यासह पाणी, वीज तसेच सुरक्षेच्या सुविधा पुरविण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

-Ads-

मागील काही वर्षांत मार्केट यार्डात दसरा आणि त्यापूर्वीच्या दोन दिवस फुलांची मोठी आवक होत असते. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून येथे फुलांची आवक होते. यापूर्वी, गूळ – भुसार बाजाराच्या गेट क्रमांक 5च्या रस्त्यालगत दसऱ्याच्या पार्श्‍वभूमिवर गोंडा यार्ड तयार करण्यात येत होता. यावेळी बाजारात झालेली अतिरिक्‍त आवक याठिकाणी उतरविण्यात येत होती. मात्र, यंदा त्यास येथील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांकडून विरोध होत असल्याचे फूल व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्यस्थितीत अतिरिक्‍त आवक झाल्यास गाळ्यात जागा नसल्याने संपूर्ण माल उतरविणे अशक्‍य आहे. तसेच, लांब जागा दिल्यास त्याचा फटका फुलांच्या विक्रीवर होणार आहे. आवक वाढल्यास जादाची आवक गाळ्यासमोर ठेवण्यात येते. अशावेळी अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा मालाच्या दर्जावर परिणाम होतो. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात कमी पैसे पडून त्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. याकडेही व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. त्याअनुषंगाने, फूल बाजारातील व्यापाऱ्यांच्या सर्व समस्यांचा विचार करून किमान सणांच्या पार्श्‍वभूमिवर गूळ – भुसार बाजाराच्या गेट क्रमांक पाचलगतच्या रस्त्यावर पूर्वीप्रमाणे गोंडा यार्डास परवानगी द्यावी.

बाजारातील अतिक्रमण हटविल्याने बऱ्याच प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे. त्याठिकाणी व्यापाऱ्यांना अतिरिक्‍त झालेली आवक उतरविता येईल. दरम्यान, अपेक्षेपेक्षा मालाची आवक वाढल्यास बाजार घटकांशी चर्चा करून पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल. नवी नियमावली अस्तित्वात आल्यानंतर बाजारातील बहुतांश समस्या मार्गी लावण्यात आल्या आहेत. अतिरिक्‍त आवकेच्या काळात पाऊस सुरू झाल्यास फुल व्यापाऱ्यांना त्यांचा माल ताडपत्रीने झाकता येईल.
‘बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती’

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)