अतिरिक्‍त पदे समान वेतनश्रेणींवर स्थानांतरित

विद्या प्राधिकरणाच्या सुधारणांना राज्य शासनाकडून मान्यता

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्या प्राधिकरणाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अतिरिक्‍त असलेली समकक्ष पदे आवश्‍यक असलेल्या समान वेतनश्रेणीतील पदांवर स्थानांतरित करण्याबाबत सुधारणा करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) ही राज्यस्तरीय शिखर संस्था व विभागीय स्तरावर प्रादेशिक प्राधिकरणे तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था यांच्या शालेय शिक्षण विभागाच्या आकृतीबंधाची पुनर्रचना करण्यात आली आहे. काही पदांमध्ये फेरबदल करून सुधारणा करण्याबाबत तसेच अतिरिक्‍त पदे मंजूर करण्याबाबत विद्या प्राधिकरणाने शासनाकडे मागणी केली होती. ती मागणी मंजूर करण्यात आली आहे.

विद्या प्राधिकरणात वर्ग 1 ची 5400 रुपये ग्रेड वेतनाची 16 पदे पूर्वीच मंजूर करण्यात आली आहेत. त्यात आणखी सहा पदे नव्याने वाढविण्यात आलेली आहेत. ही सर्व 22 पदे ज्येष्ठ अधिव्याख्याता या पदनामाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वर्ग ब मधील 4800 रुपये ग्रेड वेतनाची अधिव्याख्याता, विषय तज्ज्ञ, समन्वयक या पदनामाची 35 पदे प्राध्यापक या पदनामात रूपांतरित करण्यात आली आहेत. यातील 11 पदे प्रशासन शाखेत कार्यक्रम अधिकारी हे पदनाम धारण करणार आहेत.

ऑपरेटर कम टेक्‍निशियन हे पद मंजूर आहे. हे पद उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाने अमान्य केलेली आहे. त्यामुळे हे पद कंत्राटी पद्धतीनेच भरण्यात येणार आहे. भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, समावेशित शिक्षण व माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे विषय सहाय्यकांची एकूण 12 अतिरिक्‍त पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यात आता नव्याने सामाजिक शास्त्र या विषयाच्या सहाय्यकाचाही समावेश करण्यात येणार आहे.

लिपिक संवर्गातील मुख्य लिपिक 4, वरिष्ठ लिपिक 11, कनिष्ठ लिपिक 33 याप्रमाणे 48 पदे पूर्वीच मंजूर करण्यात आली आहेत. यातील तीन कनिष्ठ लिपिक संवर्गातील तीन पदे कमी करण्यात आली आहेत. कनिष्ठ सहाय्यक अधिक्षक पदनामाची दोन पदे व सहाय्यक ग्रंथपाल पदनामाचे एक पद मंजूर आहे. ही तीनही पदे अतिरिक्‍त स्वरूपात मंजूर करण्यात आलेली आहेत. नवीन सुधारणाबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव र. प्र. आटे यांनी जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)