अतिरिक्‍त आयुक्‍तपदी संतोष पाटील 

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा संतोष पाटील यांनी आज सोमवारी (दि.29) पदभार स्वीकारला आहे. महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, पाटील यांची महिनाभरापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2018 रोजी पिंपरी पालिकेत बदली झाली होती. महिन्याभरानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची 1 जून 2017 रोजी बदली झाली. त्यांच्या जागी मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांची वर्णी लागली होती. परंतु, हांगे पिंपरी महापालिकेत जास्त काळ टिकले नाहीत. केवळ चार महिन्यातच त्यांची तडकाफडकी बदली झाली. 1 जून 2017 रोजी पिंपरी – चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झालेल्या हांगे यांची 25 ऑक्‍टोबर 2017 रोजी तडकाफडकी बदली झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेव्हापासून पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त होते. दरम्यान, सहायक आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला होता. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर 29 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची पिंपरी पालिकेत बदली झाली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील असलेले पाटील यांच्या बदलीची महसूल विभागाने महिनाभरापूर्वीच बदलीची ऑर्डर काढली होती. मात्र, नगरविकास विभागाच्या वतीने 26 ऑक्‍टोबरला या बदलीची ऑर्डर काढण्यात आली आहे. महिन्याभरानंतर त्यांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द मराठवाडा व विदर्भात झाली आहे. सहायक प्रविण आष्टीकर यांच्याकडील अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार निरस्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)