अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार गेल्या स्वीडन दौऱ्यावर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – “टॉयलेट बोर्ड कॉलेशन’ या विषयावर स्वीडन येथील स्टॉकलहोम येथे होणाऱ्या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार उपस्थित राहणार असून, या विषयीचा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीत मंजूर झाला. 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेमुळे स्वीडन आणि भारत यांच्यामध्ये कार्यालयीन कार्यप्रणाली आणि ग्लोबल सॅनिटेशन क्रायसिस मध्ये उपाययोजना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी उपयोग होणार आहे.
या कार्यशाळेसाठी जाण्यासाठीचा विमान प्रवास खर्च संबंधित संस्था करणार असून, निवासाचा खर्चही “टॉयलेट बोर्ड कॉलेशन’ हे करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)