अतितमध्ये युवकाला दांडक्‍याने मारहाण

सख्ख्या भावांविरोधात गुन्हा

नागठाणे – अतीत (ता. सातारा) येथील युवकाला लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी येथीलच सख्ख्या भावांविरोधात मारामारीचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विक्रम अधिक यादव व चेतन अधिक यादव (रा. अतीत, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे असून रविराज सुनील जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास रविराज जाधव हा मित्र दीपक साळुंखे यांच्यासह त्यांच्या घराजवळील असणाऱ्या गोठ्यातील खोलीत बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या विक्रम यादव याने घरात येऊन दीपक साळुंखे यास अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रविराज जाधव याने ही भांडणे सोडवली. मात्र भांडणे सोडविल्याचा राग मनात धरुन काही वेळाने विक्रम यादव व त्याचा भाऊ चेतन यादव यांनी रविराज जाधव याला अतीत गावातीलच बांबू चौकात गाठला. त्यानंतर दोघा भावांनी रविराज जाधव याला लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीत रविराज जखमी झाला. रात्री उशिरा याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात त्याने दिली असून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुनील पाटील करत आहेत. दरम्यान, दोघा भावांनी मिळून एका युवकाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर अतित गावात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)