अतिक्रमण हटवण्यास आलेल्या पथकाला धक्काबुक्की

महाबळेश्‍वर येथील घटना : हातगाडी मालकासह पत्नीवर गुन्हा दाखल

महाबळेश्‍वर – छ. शिवाजी महाराज चौकात बाजारपेठेच्या प्रवेशद्वारानजिकची अतिक्रमणे काढण्यास गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्‍काबुकी करून सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी हातगाडी मालक व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-

महाबळेश्‍वर शहरात सर्वच रस्त्यांवर मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून पर्यटकांना बाजारपेठेतून पायी चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी व पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. प्रथम सुभाष चौकातील बर्फाच्या गोळे विकणाऱ्या गाड्या हलवून त्यांना वीस ते पंचवीस फुटावर पर्यायी जागा सुचवण्यात आली. यानंतर छ. शिवाजी चौकातील बर्फाच्या गोळा गाड्या काढण्यात आल्या.

यावेळी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना इम्तियाज मुलाणी व त्याची पत्नी फौजिया मुलाणी यांनी हातगाडी काढण्यास नकार दिला. त्यांना हातगाडी काढण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण विभागातील कर्मचारी हातगाडी काढण्यासाठी गेले तेव्हा फौजिया मुलाणी यांनी पालिकेच्या कर्मचारी यांच्याशी उद्धट वर्तन केले व अंगावर धावुन जावून धक्‍काबुक्‍की केली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पालिकेचे मुकादम मनोज चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मस्जीद रोडवर पालिकेच्या वाहनतळावर एका मंडळाने पत्रा शेड बांधून त्याला मंदीराचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. हे शेडही काढण्याच्या आदेश देण्यात आले होते. परंतु गेली पाच दिवस हे पत्रा शेड काढण्यात आले नाही. ते केव्हा काढण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)