अतिक्रमण कारवाई दरम्यान गोंधळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शगुन चौकात शुक्रवारी (दि. 7) अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वातावरण चिघळू लागल्याने सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील फौजफाट्यासह याठिकाणी आले. अखेर अर्ध्यावरच ही कारवाई थांबविण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या शगुन चौकात अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पदपथ, रस्ते अतिक्रमणांनी बळकावले आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील अतिक्रमणांवर कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र महापालिकेच्या वतीने “हॉकर्स झोन’चे नियोजन केले जात नसून केवळ पथारी वाल्यांवर कारवाई केली जात असल्याचाही आरोप येथील व्यापारी करत आहेत.

-Ads-

दरम्यान, आज “अ’ व “ग’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात पिंपरी कॅम्प येथील शगुन चौक ते गेलॉर्ड चौकपर्यंत ही कारवाई करण्यात येत होती. आम्हाला कोणतीही पूर्व नोटीस न देता ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी या कारवाईला विरोध केला. त्यातच कारवाईसाठी आणलेला जेसीबी बंद पडला. दरम्यान, सर्व व्यापारी याठिकाणी गोळा झाले. त्यांनी कारवाई न होऊ देण्याचा पावित्रा घेतला. तणाव वाढत चालल्याने पोलिसांबरोबरच स्थानिक नगरसेवकांनीही याठिकाणी धाव घेतली. मात्र, व्यापारी माघार घेण्यात तयार नव्हते. अखेर महापालिकेने मोजणी व मार्कींग करुन अतिक्रमण निर्मूलन पथकाने माघार घेतली.

शगुन चौकात रस्त्यावर तसेच पदपथावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. ज्यामुळे वाहतुकीला अथवा वहिवाटीला अडथळा निर्माण होईल अशा अतिक्रमणाला महापालिका कोणतीही नोटीस देत नाही. या अतिक्रमणांवर थेट कारवाई करण्याचा महापालिकेला अधिकार आहे.
– विजय भोजणे, प्रवक्‍ते, बीआरटी विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)