अतिक्रमण, अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई

पाचही झोनमध्ये तीव्रता वाढणार : माधव जगताप यांची माहिती

पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण आणि आरोग्य विभागाने अतिक्रमण आणि अस्वच्छता करणारे पथारी व्यावसायिक आणि स्टॉल धारकांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालयांच्या 100 मी. परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्या, कचरा जमा करण्यासाठी डस्टबीन न ठेवणाऱ्या व्यावसायिकांवरही दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या पाचही झोनमध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली असून, तिची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वच्छ अभियानांतर्गत पुणे महापालिकेला चांगले रॅंकींग मिळावे यासाठी पुणे महापालिका विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. याचसोबत अस्वच्छतेसंदर्भात तसेच अतिक्रमणासंदर्भात असलेल्या कायद्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत महापालिकेने मागील काही दिवसांपूर्वी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी व्यवसाय न करणाऱ्या आणि जुन्याच ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपटे रस्ता, फर्गसन रस्ता, औंध, कोथरूड येथील मुख्य रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांवर कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. प्रत्येक झोनमधील प्रमुख नऊ रस्त्यांवर पुढील काही दिवसांत याची अंमलबजावणी होईल.

डस्टबीन न ठेवणाऱ्यांवर कारवाई
आरोग्य विभागाच्या वतीने पथारी व्यावसायिक आणि भाजी विक्रेते तसेच स्टॉलधारकांना कचरा जमा करण्यासाठी डस्टबीन ठेवणे बंधनकारक केले आहे. परंतु, त्याचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने या डस्टबीन न ठेवणाऱ्या विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. डस्टबीन न ठेवल्यास 180 रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. तसेच शाळांच्या 100 मी. परिसरात पानपट्टी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)