अतिक्रमणे हटवली, राडारोडा उचलायचा कोणी?

राजगुरूनगरमध्ये आंबेडकर पुतळ्यासमोरील स्थिती ः प्रशासनावर नाराजी

राजगुरूनगर- राजगुरुनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील ओटा काढला. वीस दिवस होऊनही अतिक्रमण काढल्याचा राडारोडा जैसे थे असून पुतळ्याकडे प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी येथील राडारोडा काढून परिसराची स्वच्छता कारवाई अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरी जनतेने दिला आहे.
राजगुरुनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर बस स्थानकासमोर डॉ. बासाहेब आंबेडकर याचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या परिसरात सर्वत्र अतिक्रमणे झाली आहेत. वर्षभरात सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चार ते पाच वेळा शहरातील अतिक्रमणे हटवली. मात्र ती परत परत पुतळ्याच्या परिसरात होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झालेल्या अतिक्रमणे आणि पुतळ्याची संरक्षण भिंतीचा आडोसा शौचालय आणि मुतारीची जागा बनली असल्याने पुतळा परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. वर्षानुवर्षे येथील पुतळ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा. पुतळा आणि पुतळा परिसराचा विकास करावा अशी मागणी आंबेडकरी जनता व राजगुरुनगर मधील नागरिक करीत आहेत; मात्र याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर 17 नोव्हेंबर रोजी महसूल प्रशासन, राजगुरुनगर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन आणि पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने संयुक्त कारवाई करीत महामार्गावरील अतिक्रमणे काढली. महार्मागावरील अतिक्रमणे काढताना डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उभे राहण्यासाठी बांधलेला फरशीचा ओटा प्रशासनाने जमीनदोस्त केला. या ओट्यावर अनेक प्रकारचे आंदोलने उपोषणे झाली आहेत. आता येथे झालेला राडारोडा पुतळ्यासमोर तसाच टाकून दिला आहे.

  • प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करण्यात दुजाभाव दाखवला आहे. डॉफ बाबासाहेल आंबडेकर पुतळ्याजवळ असलेला ओटा दूर होता. मात्र जातीय भावना ठेवून तो पाडला. त्या समोरील हुतात्मा राजगुरू स्मारकाची संरक्षण भिंत रस्त्यात आहे. पोलीस स्टेशनची भिंत रस्त्यात आहे. मात्र केवळ बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील ओटा तोडला आहे. अतिक्रमण काढताना प्रांत अधिकाऱ्यांनी दुजाभाव दाखवला आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. अन्यथा भीमशक्ती संघटनेच्यावतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
    -विजय डोळस, अध्यक्ष भीमशक्ती संघटना
  • बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या ओटा प्रशासनाने जाणून बुजून पाडला आहे. अतिक्रमण काढून तेथे राडारोडा केला आहे. अभिवादन करण्यासाठी पुतळ्याजवळ जाता येत नाही. हा ओटा प्रशासनाने पूर्ववत केला नाही तर तालुक्‍यातील भीमसैनिकांच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल.
    -पी. के. पवार, तालुका कार्याध्यक्ष भारतीय बौद्धमहासभा
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमण कारवाईनंतर झालेला राडारोडा तात्काळ काढण्यात येणार आहे. पुतळा परिसर स्वच्छ ठेवण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याची जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी संवर्धन समितीने नाहरकत संमती दिली, तर तात्काळ सुशोभीकरण करण्यात येईल.
    -शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरूनगर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)