अतिक्रमणांवर पिंपरीत कारवाई

पिंपरी – पिंपरी कॅम्प परिसरात शगुन चौक, डिलक्‍स टॉकीज, जयहिंद शाळेसमोर, पिंपरी स्मशानभूमी शेजारी तसेच काळेवाडी पुलाजवळ महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. 3) अतिक्रमण करवाई करण्यात आली.

ही कारवाई अ व ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली. पिंपरी कॅम्प व शगून चौक येथे अनधिकृत विक्रेते व हॉकर्स यांच्या वाढत्या प्रमाणामुळे वाहनांसाठी व नागरिकांना चालण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे या भागात कायम वाहतूक कोंडी होते. महापालिकेकडे यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती “जैसे थे’ होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. पथकाने लोखंडी काउंटर, तीन चाकी टेम्पो, लोखंडी रॅक जप्त केला आहे. पाच कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)