अण्णा हजारे उपोषणावर ठाम ! राज्य सरकारकडून मागणी मान्य झाली म्हणजे कायदा झाला, असे नाही

उद्या सकाळी दहा वाजता राळेगणसिद्धी येथे बसणार उपोषणाला 

राळेगणसिद्धी: समाजसेवक अण्णा हजारेंची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली असून मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत असणार आहेत. लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा मंजूर करण्यात आली. ज्येष्ठ लोकायुक्त आता मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले आहे. लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली, म्हणजे कायदा झाला, असे नाही. या कायद्यास विधानसभेत मान्यता मिळणे गरजेचे आहे. आपण आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने लोकपाल कायदा मंजूर केल्यावरच उपोषण मागे घेतले जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)