अण्णा हजारे यांचे वजन २ किलोने घटले

नवी दिल्ली : जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटल्याचे सांगण्यात येत आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आज रविवारी आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

मोदींना 43 पत्रे लिहून एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे अण्णांनी म्हटले होते. अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकारकडून 22 मार्चला मध्यरात्रीपर्यंत वाटाघाटी सुरु होत्या.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी महाराष्ट्र सदनात चर्चा केली. कृषी मूल्य आयोगास स्वायत्तता देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक आहे. पण इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यावर अण्णा ठाम आहेत. अण्णा महाराष्ट्रातून दिल्लीला रवाना होण्याआधी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोनवेळा अण्णांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा आंदोलनावर ठाम आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)