अण्णा हजारे यांचे लोणावळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कार्ला – भूगोल दिनानिमित्त लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, एस. एस. जी. जी. वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोणावळा भूगोल विभागामार्फत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमानुसार भौगोलिक सहलीचे आयोजन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्रजी नय्यरसाहेब, सचिव दत्तात्रयजी पाळेकर, खजिनदार विजय दर्यानानी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पवार आणि उपप्राचार्य डॉ. जे. ओ. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

ही सहल तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती, राळेगणसिद्धी, निघोज आणि मोराची चिंचोली या ठिकाणी गेलेली होती. राळेगणसिद्धी या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन केले. अण्णा हजारे यांनी सत्य, समाजसेवा, शील, आपत्ती व्यवस्थापन, यामध्ये जल व्यवस्थापन तसेच समाज सेवेतूनच खरा आनंद, मान-सन्मान मिळतो. चांगली कृती करण्याची सुरवात स्वत:पासून करावी, असे आवाहन केले. चांगले काम करण्यास सुरवातीला अडथळे निर्माण होतात परंतु आपले ध्येय निश्‍चित करून त्या दिशेने वाटचाल करा त्यांनी युवकांना तुटपुंज्या नोकरीत अडकून बसण्यापेक्षा व्यवसाय करण्याचे सल्ला दिला.

जीवन जगण्यासाठी फार पैशाची गरज नसते. जगण्यापुरते असेल आणि बाकी सर्व समाजासाठी, आपल्या गावासाठी करणे गरजेचे आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवादात भारतातील थोर महान व्यक्‍तीची उदाहरणे दिली. यानंतर निघोज येथील रांजणखळगे, मोराची चिंचोली या पर्यटन स्थळी भेट दिली. या सहलीमध्ये एकूण 46 विद्यार्थी सहभागी झाले होते. या सहलीचे आयोजन आणि सहल यशस्वी करण्यासाठी भूगोल विभागाचे डॉ. निलेश काळे, प्रा. राहुल सलावदे तसेच प्रा. श्‍वेता मेहता, प्रा. प्रियांका पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)