अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

मान्य न झाल्यास 30 जानेवारीला पुन्हा उपोषण
सुपे – आपल्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. उर्वरित मागण्यांसाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आम्ही दोन पावले मागे येण्याचा निर्णय घेतला. दोन तारखेपासून सुरू होणारे उपोषण स्थगित केले असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. चार महिन्यांच्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा 30 जानेवारीपासून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
हजारे गांधीजयंतीदिनी सकाळी दहा वाजता विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपोषणास बसणार होते. त्यापूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी आठ वाजताच राळेगणसिद्धी गाठले. हजारे यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केल्यानंतर आज सुरू होणारे उपोषण तूर्त स्थगित केल्याचे हजारे यांनी जाहीर केले. महाजन यांनी यापूर्वी दोन वेळा राळेगणसिद्धी येथे येवून शिष्टाई केली होती; परंतु तोडगा निघाला नाही. आज अखेर महाजन यांनी पुन्हा अण्णांचे मन वळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी महाजन येणार होते; परंतु त्यांना काही कारणास्तव येता आले नाही. शिर्डीहून सकाळी आठ वाजता ते राळेगणसिद्धीला आले. त्यानंतर त्यांनी हजारे यांच्याबरोबर पुन्हा सुमारे दोन तास चर्चा केली. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील फोनवर चर्चा झाली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय हजारे यांनी जाहीर केला.
या वेळी पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, की अण्णांनी दिल्लीत उपोषण केले होते. त्यातील 90 टक्‍के मागण्या पूर्ण झाल्या आहेत. अण्णांचे म्हणणे आहे की ठिबक, तुषार सिंचन यावर जो 12 टक्‍के जीएसटी लावला आहे, तो पाच टक्‍के करावा. त्याबाबत केंद सरकार लवकरच निर्णय घेईल. सरकारने दीडपट भाव जाहीर केला आहे. लोकपाल व लोकयुक्‍तासाठी विशेष वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. या महत्वाच्या मागण्यांसाठी केंद्र सरकारशी चर्चा करून त्याबाबतचे पत्र हजारे यांना दिले.
हजारे म्हणाले, की सरकार आमच्या देशाचे असल्यामुळे सरकारवर विश्‍वास आहे. चर्चा करून प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सरकारने चार महिन्यांत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सरकारने मागण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे आम्हीही दोन पावले मागे आलो आहोत. चार महिन्यांच्या कालावधित उवर्रित मागण्या मान्य न झाल्यास महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण करणार आहे. या उपोषणाचे ठिकाण देशातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवले जाईल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)