अण्णा हजारे यांचं उपोषण अखेर मागे

नवी दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, लोकपाल नियुक्त करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह आपल्या इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण सुरु केलं होतं. आज अखेर उपोषणाच्या सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. अण्णा हजारेंच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या अनेक  मागण्या मान्य झाल्याचं यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडलं. यावेळी व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते.दरम्यान मागण्या मान्य झाल्या असल्या तरी देखील, त्या पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची वाट पाहण्यात येईल अन्यथा पुन्हा  आंदोलन करणार असल्याचा इशारा  अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

  1. वरील वृत्त वाचण्यात आले सहा महिन्यात कोणत्या घडामोडी होतील हे कोणीच सांगू शकत नाही आणि सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेता ह्यात अनिश्चितीता हि 99% असल्याचे पाहावयास मिळते तेव्हा ह्यावर एकमेव उपाय म्हणजे आता श्री आणा ह्यांनी येण्यार्या निवडणुकीसाठी देशातून कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेले ५०० उमेदवार निवडावेत व ह्यांना निवडणूक लढविण्यास उभे करावे व स्वतःचा जाहीरनामा घोषित करावा कारण सत्तेत आलेल्या राजकीय पक्षाने वेळोवेळी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण झाली नाहीत ह्याचा अनुभव असताना सहा महिन्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवणे हे आस्चर्य नवे ? समजा यदाकदाचित अपरिहार्य कारणाने अथवा युद्धसदृश प्राईस्थिती कारणास्तव आणीबाणी लावण्याची परीस्थिती निर्माण झाल्यास मागण्या पूर्ण होण्याची कितीपत शक्यता असू शकते ? सध्या आघाड्याचे जे प्रयत्न होताना दिसतात त्याला सर्वसामान्य मतदार कंटाळलेला आहे परंतु भरवशाचा उमेदवार समोर आल्यानेच इच्छा नसताना कोणालातरी मत देणे भाग पडते हि खरी अडचण आहे ह्याचा गांभीर्याने विचार होणे हि काळाची गरज ठरते

  2. वरील वृत्त वाचण्यात आले श्री आणा ह्यांनी उपोषण सोडले म्हणजे त्यांच्या मागण्यांचे उशिराने होणारे पोषण ह्याला मान्यता दिली असेच म्हणावे लागेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)