“अण्णा भाऊ साठे यांच्या घराला न्याय मिळवून देऊ’

पुणे, दि.31 – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबईतील घराला न्याय मिळवून देऊ असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, धनंजय मुंढे यांनी दिले आहे, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यीक, संशोधक, लेखक धर्मपाल कांबळे यांनी कळविले आहे.

मुंबईतील गोरेगाव पश्‍चिममधील सिध्दार्थनगर येथील म्हाडाच्या बिल्डींगमध्ये बी 40/159 हे घर सरकारने अण्णा भाऊ साठे यांना दिले होते. त्यांच्या मृत्युनंतर हे घर कुमुदिनी वसंत कुलकर्णी यांनी बळकावले असून, सरकारने ते घर ताब्यात घेवून त्याठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारावे अशी मागणी धर्मपाल कांबळे यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्यासह विखेपाटील आणि मुंढे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, धर्मपाल कांबळे यांनी “शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा’ हे पुस्तक लिहिले असून त्यांचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात अण्णा भाऊ साठे यांच्या घराबाबतचे सर्व पुरावे देण्यात आले आहे. त्यानुसार कांबळे यांनी या पुस्तकाच्या प्रती विधानसभा अध्यक्ष यांच्यासह विखेपाटील आणि मुंढे यांना दिल्या आहेत. त्यानुसार याबाबत म्हाडाकडे चौकशी करू आणि अण्णा भाऊ साठे यांच्या घराला न्याय मिळवून देऊ असे आश्‍वासन बागडे यांनी यावेळी दिले. तर याबाबत सभागृहात आवाज उठवू असे विखेपाटील आणि मुंढे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)