अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात

 

गोंदवले, दि. 1 (वार्ताहर) – जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची संयुक्त जयंती गोंदवले खुर्दमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या जन्मगावाहून ज्योत प्रज्वलीत करून आणण्यात आली. कलारंजन मित्र मंडळाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले अहिल्याबाई शिवाजी महाराज उमाजी नाईक यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. ज्योतीचे सकाळी 11 वाजता गावात आगमन होताच. सरपंच अजितराव पोळ, उपसरपंच भाऊसो जाधव पोलीस-पाटील सचिन अवघडे यांच्या सहमहिलांनी मोठ्या उत्साहात स्वागत करून वाजत गाजत ज्योत मुख्य ठिकाणी आणण्यात आली. यावेळी अण्णाभाऊंच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी तीस कादंबऱ्या तसेच जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिल्या. त्यांचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता चौदा भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, पोलीश, रशियन इत्यादी परकीय भाषात भाषांतरीत झाले आहे. त्यांच्या साहित्यात संघर्ष विद्रोह प्रकर्षाने जागोजागी जाणवतो. त्यांची पात्रे शोषित दलित जनतेची दु:खे वाचकांपर्यंत वास्तवपणे पोहोचवतात. सायंकाळी सजवलेल्या ट्रॅक्‍टरमधून त्यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)