अण्णाभाऊ साठे जंयती निमित्त मिरवणूक

नीरा- नीरा (ता. पुरंदर) येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच दिव्या पवार यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी गावातील मुख्य पेठेतुन मिरवणूक काढण्यात आली. यानंतर नीरा ग्रामपंचायतीच्या जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, आरपीआयचे शहराध्यक्ष नंदकुमार ढावरे, भाऊसाहेब धायगुडे, विजय पाटोळे, बापू पाटोळे, पोपट खुडे, शुभम पांगरेकर, गुळूंचेचे माजी उपसरपंच भानुदास पाटोळे, समता आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यु. जी. माने, सूर्यकांत कांबळे, दयानंद चव्हाण, रविंद्र काकडे, विजय खुडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजू गोरे, सुनील पाटोळे उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)