अण्णापुरातील अंजनबाबा पाणपोई भागवतेय वाटाड्यांची तहान

अण्णापूर- शिरुर-भीमाशंकर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची अंजनबाबा पाणपोईच्या माध्यमातून तहान भागवत आहे. अण्णापूर (ता.शिरूर) येथील झंजाडवस्तीच्या तरुणांनी एकत्र येऊन अंजनबाबा प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत. गेल्या सहा वर्षापूर्वी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष झंजाड यांच्या संकल्पनेतून अंजनबाबा पाणपोईची उभारणी केली. यासाठी अंजनबाबा प्रतिष्ठानचे शिलेदार स्व.संदीप झंजाड यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे रोहीदास झंजाड, मोहन झंजाड, हरिष झंजाड, मछिंद्र झंजाड, शरनू भंडारी, गणेश झंजाड, सागर झंजाड, भाऊ झंजाड, शंकर झंजाड, सुभाष झंजाड, भाऊ दसगुडे, केशव शिंदे या सर्वांची बहमोल साथ त्यांना मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)