अण्णाच्या आंदोलनाला यश मिळावे यासाठी माऊलींना साकडे

आळंदी – शेतमालाला दर मिळावा, लोकपाल व लोकायुक्त यांसह विविध मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे गुरुवारी (दि. 23) नवी दिल्ली येथे उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला यश मिळावे यासाठी माऊलींना मंगळवारी (दि. 20) साकडे घालण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे जिल्हा अध्यक्ष राधेश्‍याम जगताप, तालुका अध्यक्ष सुरेश टाकळकर, आळंदी पालिकेचे उपाध्यक्ष सागर भोसले, पै.बाळासाहेब चौधरी, माजी सरपंच सोमनाथ मुंगसे, प्रकाश पाचारणे, महादेव पाखरे, किशोर कुऱ्हाडे, संदेश तापकीर, पुंडलिक कोहिनकर, शिरीष कारेकर, गोविंद बुट्टे सोपान शेळके राजु वाबळे आदींसह तालुक्‍यातील मान्यंवर उपस्थित होते. आंदोलन करण्याची वेळ शासनाने आंदोलनकऱ्यांवर आणू नये, त्यापुर्वीच मागण्या मान्य कराव्यात. यासाठी आळंदी माऊली मंदिरात श्रींना अभिषेक करून साकडे घालण्यात आले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)